कोयता गॅंगनंतर आता रुमाल गॅंगचा पुण्यात धुमाकूळ! 30 गाड्या फोडल्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
पुणे : पुण्यात काही दिवसांपासून कोयता गॅंग सक्रिय झाली आहे. असे असताना आता तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टी परिसरात तब्बल 30 गाड्या फोडल्या आहे. 06 जणांनी तोंडाला रुमाल बांधून ही वाहन फोडली आहे.
त्यामुळे या गाड्या रुमाल गँगने फोडल्या असल्याचे बोलले जात आहे. या वाहनांमध्ये ऑटो रिक्षा, टेम्पो, कार इत्यादी वाहनांचा समावेश आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे आता कायदा सुव्यवस्था कुठे आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वारजे परिसरात काल कोयता गँगकडून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.