वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांचे एक पाऊल मागे! भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा दिला राजीनामा…

पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अनेक संघटनांनी, एवढंच नाही तर शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं आहे. एवढंच नाही विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. अशातच आता राहुल सोलापूरकरने पुण्यातील ऐतिहासिक संस्थेकडे आपल्या विश्वस्तपदाचा राजीनामा सोपवला आहे.
राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच भांडारकर संस्थेने देखील राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्विकारला आहे. राहुल सोलापूरकर यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. त्यानंतर शिवप्रेमींनी आक्रमक झाले होते.
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात पहायला मिळाले होते. अशातच आता राहुल सोलापूरकर यांनी पुण्यातील ऐतिहासिक भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेता हेमंत ढोमे, अमोल कोल्हे, इतिहासकार, शिवाजी महाराजांवर अभ्यास करणारे अभ्यासक, राजकीय संघटना यांनी देखील आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफीनामा जाहीर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विधान केल्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला होता.