पुणे बस बलात्कार प्रकरणानंतर अजून एक भयंकर घटना, बसस्थानकाच्या बाथरूममध्ये तरुणीचा मृतदेह, घटनेने उडाला थरकाप….


गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजदेरवाडी येथील सुवर्णा यशवंते ही २३ वर्षीय तरुणी चांदवड बसस्थानकाच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याबाबत तपास सुरु आहे. दुपारी ११ ते १२:३० वाजेच्या सुमारास सुवर्णा यशवंते हिची तब्येत बरी नसल्याने तिला भाऊ राकेश व आई सरूबाई व दीर राहुल यशवंते यांनी चांदवड येथे दवाखान्यात आणले.

दीर राहुल यशवंते यांनी तिघांना बसस्थानकात सोडून बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा भावजयी सुवर्णा ही बाथरूममध्ये गेली होती. दरम्यान, बसस्थानकातील बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता. यामुळे त्यांनी इतरांना ही माहिती दिली. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला.

यावर दार न उघडल्याने भाऊ राकेशने बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक यांना बोलावून सदर बाथरूमचे दार तोडले. तेव्हा भावजयी सुवर्णा ही बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यामुळे नेमकं घडलं काय याबाबत तपास सुरु आहे. यामुळे मात्र सगळेच हादरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!