एकनाथ शिंदे यांच्यानंतर फडणवीसांसाठीही आली गुड न्यूज! पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात घेतली आघाडी…

मुंबई : आज राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये नागपूरमधील पदवीधरची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण मुख्यमंत्री स्वत: नागपूरचे आहेत. नागपूर पदवीधर मतदार संघात एकूण 38 उमेदवार रिंगणात उभे आहेत. मुख्य लढत भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात आहे.

सध्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला पहिली गुड न्यूज मिळाली. अमरावती शिक्षक मतदारसंघातून एकनाथ शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर आहेत. त्यानंतर आता भाजपसाठी गुड न्यूज आहे. नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत.
सध्या सगळीकडे चुरस निर्माण झाली आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. अभिजित वंजारी इथून निवडून आलेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढत आहेत. अभिजित वंजारी हे महाविकास आघाडीचे तर सुधाकर कोहळे हे महायुतीचे उमेदवार आहेत.


दरम्यान, पसंतीक्रम आधारित मतदान पद्धतीत उमेदवाराला विजयी होण्यासाठी वैध मतांचा एक निश्चित कोटा पूर्ण करावा लागतो. जर पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कोणत्याही आघाडीच्या उमेदवाराला हा कोटा गाठता आला नाही, तर पुढील फेऱ्यांमधील मतमोजणी आणि पसंतीक्रमांचे हस्तांतरण निकालाची दिशा ठरवू शकते.
आज विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती येणार आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. अगदी काही वेळातच निकाल हाती येतील. पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मोजणीला झाली आहे सुरुवात. एकाच वेळेस 70 टेबलवर मतपत्रिकेची मतमोजणी सुरू आहे.
