‘एकच वादा अजित दादा’नंतर आता आपल्या वाहिनी आहेत ना! प्रसिद्ध राजकीय रणणितीकार प्रशांत किशोर यांच्याकडून नवीन टॅगलाईन…


मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुर्नबांधणी चालू केली असून पक्षाच्या मूळ बांधणीसह पक्षाच्या हक्काचा व्होट बॅकेला आकार देण्यासाठी पक्षाकडून रणनीती आखली जात असून पक्षाला मूळ चेहऱ्याला अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आणण्याची रणनीती अंतिम करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या पश्चात पक्षाला भक्कम जणाधार व संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाने प्रयत्न चालू केले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे ब्रँडिंग करण्याची जबाबदारी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी राजकीय रणनीतीकार म्हणून चालू केली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आतापर्यंत अजित पवार यांच्यानापुढचा गुंजणारा आता नव्या टॅगलाईने पुढे येणार असून ‘एकच वादा अजित दादा’ ही टॅगलाईन आता बदलण्यात येणार आहे. त्याऐवजी ‘आपल्या वाहिनी आहेत ना!’ या नव्या घोषवाक्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा वाहिनी पवार यांचे नव्याने राजकीय ब्रँडिंग करण्याची तयारी सुरू आहे.

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पक्षाचे नव्या पद्धतीने कॅम्पेनिंग आणि कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आखली जात असून पक्षाच्या नाशिक येथे २७ सष्टेंबर रोजी होणाऱ्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांच्या नव्या नेतृत्वाला स्ट्रॅटेजिक ओळख निर्माण करुन देण्यासाठी पक्षाने कार्यक्रम आखल्याची चर्चा आहे. या नव्या मोहिमेत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची आणि पक्षाच्या नव्या राजकीय प्रतिमेची मांडणी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!