दारु पिल्यानंतर माणूस इंग्लिश का झाडतो ? पुढे आले हे संशोधन…!
नवी दिल्ली : दारूचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दारूच्या अति सेवनामुळे किडनी, लिवर खराब होण्याचा धोका उद्भवू शकतो. पण एका नव्या अभ्यासानुसार दारुचे काही फायदे सांगण्यात आले आहे. रिसर्चमध्ये केलेल्या दाव्यानुसार दारुमुळे मनुष्यात भाषा कौशल्य सुधारतं विशेष म्हणजे दारू प्यायल्यानंतर अनेक भारतीयांचना इंग्रजी बोलण्याचा मोह होतो.
आपण अनेक वेळा पाहिलं असेल दारू प्यायलेला व्यक्ती फर्राटेदार इंग्रजी झाडतो. मद्यपान केल्यानंतर लोकांचे दुसऱ्या भाषेचे कौशल्य सुधारते आणि ते त्या भाषेत अस्खलितपणे बोलू लागतात. डच यूनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या काही लोकांवर या रिसर्चअंतर्गत अभ्यास करण्यात आला आहे. मातृभाषा जर्मन असणाऱ्या काही लोकांना दारू पाजण्यात आली. दारू पिण्याआधी सर्व जर्मन भाषेत बोलत होते, ही लोकांनी नुकतीच डच भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. डच भाषा शिकणारे जर्मन विद्यार्थी उत्तमरित्या डच भाषा बोलत होते. विशेष म्हणजे त्यांची डच बोलण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढली होती.
दारूमुळे आत्मविश्वास वाढतो इंग्रजी किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा बोलण्यासाठी बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. अल्कोहोलमुळे मानवाची बौद्धिक क्षमता बिघडते आणि त्याचा वाईट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो.
नवीन अभ्यासानुसार अल्कोहोल बौद्धिक क्षमता मजबूत करते आणि यामुळे आत्मविश्वास देखील अनेक पटींनी वाढतो. अस्वस्थता,चिंता आणि भीती निघून जाते.अल्कोहोलच्या प्रभावामुळे जेव्हा इतर लोकांशी संभाषण होते, तेव्हा त्या व्यक्तीची दुसऱ्या भाषेत बोलण्याची क्षमताही वाढते. याचे परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावरही पाहिला मिळतात