Afghanistan : अफगाणिस्तान येथे भूकंपामध्ये २ हजार जणांचा मृत्यू, हजारो जखमी, उडाला हाहाकार…

Afghanistan नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये एका मोठ्या भूकंपाने हाहाकार उडाला आहे. याठिकाणी ६.३ रजिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे इमारती जमीन दोस्त झाल्या आहेत. अनेकांचे जीव देखील यामुळे गेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत २ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. Afghanistan
तसेच हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. पश्चिम अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भूकंप झाला आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या जवळपास २ हजारच्या पुढे गेली आहे. Afghanistan
शनिवारी सकाळी ११ वाजता अफगाणिस्तानमधील हेरात शहराच्या पश्चिमेला ४० किमी अंतरावर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर शेजारील बडघिस आणि फराह प्रांतात जोरदार हादरे जाणवले.
दरम्यान, या शक्तिशाली भूकंपानंतरही पश्चिम अफिगाणिस्तानमध्ये भूकंपानंतर जोरदार हादरे म्हणजे आफ्टर शॉक बसले. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत.
भूकंप आणि आफ्टरशॉकमुळे हेरात प्रांतातील झेंडा जान जिल्ह्यातील चार गावांतील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. फराह आणि बगेस प्रांतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.