अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला हायकोर्टाचा दणका ; विदेशी जाण्यावर घातली बंदी, काय आहे प्रकरण?

पुणे : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुद्रा चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणी हाय कोर्टाने त्यांना चांगला दणका दिला असून परदेश दौऱ्याची त्यांची परवानगी नाकारली आहे.

शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा याला २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान विदेश प्रवास करायचा असताना ‘लुकआऊट नोटीस’ जारी झालेले असल्यानं त्याविषयी त्यांना हंगामी दिलासा मिळू शकला नाही. कारण ही नोटीस रद्द होण्याविषयी त्यांनी केलेल्या याचिकेवर ८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी लांबणीवर पडली आहे.सन २०१५ ते २०२३ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांत फसवणूक केली, अशी तक्रार व्यावसायिक दीपक कोठारी यांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (इओडब्ल्यू) चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘लुक आऊट’ची नोटीसही जारी केलेली आहे. परिणामी विदेश प्रवासात अडचण निर्माण झाल्यानं या दाम्पत्याने याचिका केली आहे. परिणामी आता विदेशी दौऱ्याची परवानगी कोर्टाने नाकारली आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुद्रा यांनी परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या लूक आउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली आहे.
