पैशांअभावी उपचार न दिल्याने आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर होणार कारवाई! आरोग्य मंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश…


पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपलाजीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.

आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे गर्भवती पत्नीच्या मृत्यूसाठी रुग्णालयाच्या आडमुठ्या धोरणांला जबाबदार धरण्यात येणार आहे. राज्यात या प्रकरणावर संतापाची लाट असणे स्वाभाविक आहे.

पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने२५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.

मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक येणारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्य द्वारावर तपासूनच आत मध्ये सोडलं जात आहे. मुख्य द्वारावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिसांकडून आज रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा बाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणारं आहे.

त्यांनतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाणार आहे. तर प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू प्रकरणात आता संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. गंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांनी घ्यावयाच्या काळजीबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!