वाघोली ते पेरणेफाटा पर्यंत अतिक्रमणांवर कारवाई, मग सोलापूर रस्ता पाठिमागे का! आमदार महोदय सोलापूर रस्त्याकडे थोडे बघाच..


जयदिप जाधव

उरुळीकांचन : पुणे -अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली ते पेरणे फाट्यापर्यंत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर पीएमआरडीए,पुणे शहर पोलिस ,मनपा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करीत या मार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यानंतर या भागातील रस्ता वाहतुक कोंडीमुक्त करण्याची जिल्हा प्रशासनाने स्वागतार्य कामगिरी केली आहे. तशीच कारवाई पुणे – सोलापूर महामार्गावरील कवडीपाट ते उरुळीकांचन पर्यंत करुन रस्त्याला मोकळा श्वास निर्माण करुन देणार काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पुणे- अहिल्यानगर मार्गावर वाघोली ते पेरणेफाटा पर्यंत सातत्याने होणारी वाहतुक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा पुढाकारातून वाघोली ते पेरणे फाट्यापर्यंत अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू आहे. पीएमआरडीए, मनपा, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यांत तेल घालून या मार्गावरील रस्ता अतिक्रमणांवर कारवाई करीत आहेत. कारवाईने या परिसरात रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे. आमदार ज्ञानेश्वर कटकेंनी वाहतुक कोंडीचा जखमेवर मूळ शोधून बेधडकपणे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांनी स्वतः हाची कार्यालयाची स्वागत कमान जमीनदोस्त करुन आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यानंतर अतिक्रमण धारकांनी स्वयंप्ररणेने हे
अतिक्रमण काढून टाकित आहे.

पुणे -सोलापूर महामार्गावर लोणीकाळभोर, थेऊर फाटा व उरुळीकांचन चौकांत अशीच परिस्थिती असून वाहतुककोंडीला अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई होणार काय असा सवाल उपस्थित होत आहे. उरुळीकांचन शहरात वाहतुक कोंडीचा समस्या तीव्र आहे.या ठिकाणी स्थानिक पोलिस निरीक्षक हे विविध कल्पना तयार करुन कोंडीची समस्या सोडवित आहे. मात्र या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करीत नसल्याने अतिक्रमणे कोणी काढावी असा प्रश्न आहे. तर काही ठिकाणी या कोंडीमुक्त करण्याचा उपयांवर ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक कोंडीची ‘खिंड’ कोन पुढाकार घेणार म्हणून थेट कारवाईची आवश्यकता निर्माण झाली आहे. या महामार्गावर एनएचआय ने अतिक्रमणे काढण्यास अवाहन करूनही अतिक्रमणे काढण्यासाठी स्थानिक धजावत नसल्याने वाघोली ते पेरणेफाटा पर्यंत झालेली कारवाई या सोलापूर महामार्गावर करुन या रस्त्याला मोकळा श्वास मिळून द्यावा अशी मागणी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!