पुणे शहरात 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई…!


पुणे : सध्या पुण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचे नेमके कारण काय असा प्रश्न पडला आहे. मार्च महिन्यात या सेंटर्सवरील मशीन 2 ते 7 दिवसांसाठी सील केले जाणार आहेत.

गेल्या वर्षी आरोग्य विभागाने धडक मोहीम राबवून 46 सेंटरवर कारवाई केली होती. मागील वर्षीच्या शेवटच्या पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत समितीच्या बैठकीत चर्चा करून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य विभागातर्फे दर तीन महिन्यांनी शहरातील सुमारे 750 सोनोग्राफी सेंटरची पाहणी केली जाते. कोणत्याही त्रुटी आढळून आल्यास नोटिसा पाठवल्या जातात. फॉर्म एफवर सही नसणे, नोंदणी वही अपूर्ण असणे, महिन्याचा अहवाल वेळेत न पाठवणे अशा कारणांमुळे 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षीच्या शेवटच्या पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत समितीच्या बैठकीत चर्चा करून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाहणीचा अहवाल सल्लागार समितीसमोर ठेवला जातो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!