Accident News : कोरेगावमूळला तीन वाहनांची एकमेकांना पाठिमागून जोरदार धडक! दोघे जागीच ठार, तीन जण जखमी, महामार्गाची दैना कायम…
Accident News : पुणे- सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाट्यावर ३ ते ४ वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी (ता.०३) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सुनिल नवनाथ जाधव (वय. २७,रा. भांडगाव, ता.दौंड, जि.पणे ), विजय भिल्ल (वय -२३ रा. शिंदवणे, ता.हवेली , जि.पुणे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत.
सोलापूरहुन पुण्याकडे जाताना इनामदार वस्तीकडे गाडी एकामागून एक धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. तसेच पीकपणे कँटरला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाले आहेत. या अपघातात एकाचे दोन्ही पाय तुटले आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दोन तास रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा खोळंबा उडाला होता. शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसचे टायमिंग चुकल्याने बसेस चालकांनी बसेस न चालवल्याने विद्यार्थ्यांची एक दिवसाची शाळा बुडण्याची वेळ उद्भवली आहे.
कवडीपाट ते कासुर्डी महामार्गाची दुर्दशा कारणीभूत…!
कवडीपाट ते कासुर्डी महामार्गावर सातत्याने अपघातांचा सिलसिला कायम आहे. गेल्या महिन्यातच सोरतापवाडी हद्दीत एका युवकाचा अपघातात बळी गेला आहे. तर आता दोघांना आपले जीव गमवावे लागले आहे. या दरम्यानच्या महामार्गाची रस्त्याची प्रत अतिशय खराब अवस्थेत आहे.
महामार्ग प्राधिकरणाने बेवारसपणे सोडला असताना या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार व खासदार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आले आहे. त्यामुळे या महामार्गावरचा सुरक्षितेचा प्रश्न पाच वर्ष उलटून पडून आहे.