Accident News : शिरूरमध्ये भीषण अपघात! कंटेनर स्विफ्ट एकमेकांना धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी…


Accident News  शिरूर : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरगाव फाटा येथे कार व कंटेनरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना सोमवार (ता.५) शिरूर-सातारा महामार्गावर नागरगाव फाटा येथील हॉटेल अन्नपूर्णा समोर घडली आहे. याबाबत लाभेश गणपतराव औटी (वय-३९, व्यवसाय- शेती, राळेगणसिद्धी, ता-पारनेर, जि-अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनोजकुमार सोन्याबापू औटी (वय.३२, रा- राळेगणसिद्धी, ता-पारनेर ,जि -अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सागर रावसाहेब भुजबळ (रा-भुजबळवस्ती पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यावरून कंटेनर चालक दत्ता चांगदेव सोनवणे (रा.किनगाव, ता-अहमदपुर, जि-लातुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील नागरगाव फाटा येथील हॉटेल अन्नपुर्णा समोर हा अपघात झाला आहे. कंटेनर चालक दत्ता सोनवणे हा कंटेनर (एन. एल. ०१ ए-ई ८२५२) भरधाव वेगात चालवत पुढे जात असताना स्विप्ट कार (एम. एच. १२ एच.झेड ७५७७) यामधुन जात असलेल्या मनोजकुमार औटी यांना जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये औटी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला, तर सागर भूजबळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, यासंदर्भात लाभेश औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!