Accident News : इंदापूरमधील शैक्षणिक सहलीच्या बसला भीषण अपघात, एक शिक्षण जागीच ठार, विद्यार्थी जखमी…

Accident News : इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला आहे.
या आपघातामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर शिक्षक व विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बावडा (ता.इंदापूर) येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल (ता. १९) रोजी रात्री गणपतीपुळे येथे गेली होती. त्यानंतर आज (गुरुवार, ता. २१ रोजी) सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीलगत सहलीची एसटी बस (एसटी क्रमांक एमएच १४ बीटी ४७०१) व टेम्पो यांची धडक झाली.
यावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. बस व टेम्पोची धडक एवढी भीषण होती की एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य शिक्षक व विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले असून, जखमींना उपचारार्थ अकलूज येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.