Accident News : कदमवाकवस्ती येथे भीषण अपघात, अज्ञात वाहनाची दुचाकीवरील बाप-लेकाला धडक, मुलगा गंभीर जखमी..

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहेत. अशातच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला आहे

सुरज दुपारे (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. हा अपघात कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनोव्हरा शाळेजवळ रविवारी (ता. ३) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. Accident News
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून बाप-लेक दुचाकीवरून चालले होते. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या झालेल्या धडकेने दुचाकीवरील बाप-लेक खाली पडले. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिक तातडीने बाप-लेकांच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या दोघांनाही उचलले व तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले.
दरम्यान, या महामार्गावर दुचाकी पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांनी तत्काळ महामार्गावरील दुचाकी हटविली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली.