Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचननजीक भीषण अपघात, दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार….


Accident News : राज्यात सध्या अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील सहजपुर गावचे हद्दीत म्हेत्रे वस्तीसमोर आज दुपारी साडेचार वाजता दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच मयत झाले असून एका ट्रकमधील क्लीनर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. रंगाच्या डब्याने भरलेला आयशर टेम्पो पुण्याकडून सोलापूरच्या बाजूला निघाला होता तर पांढऱ्या रंगाचा ६१० टेम्पो यवतवरून उरुळी कांचन बाजूने निघाला होता.

६१० पांढऱ्या रंगाचा टेम्पो म्हेत्रे वस्तीवाजवळ आला असता पुढच्या बाजूकडून आलेला आयशर टेम्पोच्या चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने आयशर दुभाजक तोडून पांढऱ्या रंगाच्या ६१० टेम्पोवर आढळला. Accident News

या अपघातात दोन्ही वाहनांचा वेग अति असल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या टेम्पोतील दोन्ही चालकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर क्लीनर जागेवरच मयत झाला आहे.

या अपघातातील मयतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते विशाल म्हेत्रे उरुळी कांचन येथील कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, यवत पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने पुढील कार्यवाही सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!