Accident News : ताम्हिणी घाटात मोठा अपघात! बस उलटून २ ठार, ५५ जखमी, बसचा झाला अक्षरशः भुगा…


Accident News : राज्यामध्ये अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. रायगडमध्ये एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत असून, पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटना स्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, ५५ जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. Accident News

मिळालेल्या माहिती नुसार, रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हीणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे.

अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. दरम्यान, कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर, ५५ जखमी झाल्याचे माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!