Accident News : दुःखद!! ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने १२ वर्षीय मुलाला चिरडलं..

Accident News : सध्या जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यासाठी ट्रक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून ऊस वाहतूक होत आहे. मात्र, ही वाहतून अनेकदा धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना यावल तालुक्यातून समोर आली आहे. येथे ऊस वाहतूक ट्रक्टरखाली आल्याने बारा वर्षांचा मुलगा ठार झाला आहे.
आनंद रघुनाथ सोनवणे (वय.१२ वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या मुलाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. Accident News
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक चांगलेच संतापले आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करा,अशी मागणी केली जात आहे पोलिसांनी ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून निमगाव या गावात या घटनेने शोककळा पसरली आहे.