दौंडजवळ मालगाडीचा डबा घसरून अपघात..!


दौंड : मालगाडीचा डबा घसरल्याने सोलापूरकडे जाणा-या रेल्वे प्रवासी वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. वंदे भारत, हुतात्मा एक्स्प्रेस, काकीनाडा एक्स्प्रेस या गाड्या तीन तास उशिराने धावत असल्याने सोलापूर स्थानकात या गाड्या उशिरा पोहोचणार असल्याची शक्यता रेल्वे अधिका-यांनी वर्तवली आहे.

चिंचवड ते वाडीदरम्यान जाणा-या सामग्री एक्स्प्रेसचा डबा दौंडजवळ घसरला. त्यामुळे सोलापूरकडे किंवा दक्षिण भारताकडे जाणा-या रेल्वे प्रवासी वाहतूक करणा-या मेल एक्स्प्रेस गाड्यांवर थेट परिणाम झाला आहे. रेल्वे मेकॅनिक विभागाने शर्थीचे प्रयत्न करून सामग्री एक्स्प्रेसचा डबा रुळावर आणला असल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले आहे.

चिंचवड येथून निघालेल्या सामग्री मालगाडीची एक ट्राली रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दौंड जवळ घसरली. यामुळे सोलापूरकडे जाणा-या प्रवासी एक्स्प्रेस मेल वाहतुकीवर थेट परिणाम झाला. जवळपास दोन तास मालगाडीचा डबा रेल्वे रुळावर आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सामग्री मालगाडीचा डबा रुळावर आणून दौंड स्थानकाकडे मालगाडी रवाना करण्यात आली.

मालगाडीचा डबा घसरल्याने सायंकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकांवरून निघालेल्या प्रवासी वाहतुकीच्या मेल एक्स्प्रेसवर थेट परिणाम झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून हुतात्मा एक्स्प्रेस सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास निघते, तर वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सोलापूरकडे निघते. याच दरम्यान काकीनाडा एक्स्प्रेस देखील पुण्याहून सोलापूरकडे प्रस्थान करते.

दौंडजवळ डबा रुळावर आणण्याचे काम सुरू होते. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस, काकीनाडा एक्स्प्रेसला लोणीजवळ थांबा देण्यात आला होता, तर वंदे भारत एक्स्प्रेसला पुणे स्थानकावर जागा नसल्याने खडकी रेल्वे स्थनाकावर यायला रात्री ९ वाजले. यामुळे वंदे भारत, हुतात्मा एक्स्प्रेस जवळपास तीन तास उशिरा सोलापूर स्थनाकावर पोहोचतील. रात्री १० वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकात दाखल होणा-या या महत्वाच्या मेल एक्स्प्रेस रात्री १ वाजण्याच्या सुमारास दाखल होतील, असा अंदाज रेल्वे अधिका-यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!