एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात! पुण्यातील एकाच घरातील तिघांचा जागीच मृत्यू….!
पुणे : पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथील गावात दुःखद घटना घडली आहे. एसटी आणि दुचाकी च्या अपघातात तीन तरुणांचा लोणंद येथे जागीच मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
ओंकार संजय थोपटे ( वय २२) ,पोपट अर्जुन थोपटे (वय २३),अनिल.नामदेव थोपटे (वय २५) ,असे या अपघातात मृत्यू झालेल्या तिघा तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे कामानिमित्त मोटरसायकलवरून लोणंद येथे गेले होते .लोणंद -निरा रोडवर लोणंद पासून दोन किलोमीटर अंतरावरीलल रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एम एच 20 बी एल 4158 व निरेकडून लोणंद निघालेली मोटरसायकल क्रमांक एम एच 12 RV 3158 यांच्यात जोरदार धडक झाली अपघात इतका भीषण होता यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला
दरम्यान , सामान्य शेतकरी कुटुंबातील हे तिघे तरुण होते. काहींचे नुकतेच शिक्षण संपले होते तर काहींचे शिक्षण चालू होते. काल थोपटे वाडी येथील गावात उत्सव साजरा होत असताना दुःखाची बातमी गावात गेली. या घटने नंतर पिंपरे आणि थोपटेवाडी गावात शोककाळा पसरली आहे.