अष्टापुर फाट्यावर किरकोळ कारणावरून तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण, 7 ते 8 जणावर गुन्हा दाखल

पुणे : अष्टापुर फाटा परिसरात पाण्याच्या टाकीजवळ थुंकू नका म्हटल्याच्या किरकोळ कारणावरून 7 ते 8 जणांनी एका तरुणाला लाथा बुक्यांनी व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिपक संभाजी गवारे (वय 35, रा. कल्लकवाड, पिंपरी सांडस ता, हवेली) नरेश आनंद पाईकराव (वय -25, रा. स्वामी समर्थ पार्क अष्टापुर फाटा, पिपरी सांडस ता. हवेली), व इतर 7 ते 8 अनोळखी इसमांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्निल कुंडलिक कोतवाल (वय 34, धंदा शेती, रा. शिवनगर, आष्टापूर फाटा, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(2), 118(2), 352,351(1), 189(2), 190, 191(2)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल कोतवाल हे पिण्याच्या पाण्याचा जार भरण्यासाठी स्वामी समर्थ पार्क अष्टापुर फाटा येथे गेले होते. यावेळी जार नळाखाली भरत असताना नरेश पाईकराव हा जारच्या जवळ थुंकला, यावेळी कोतवाल यांनी त्यास पाणी पिण्यासाठी घेवुन जात आहे तु तिकडे लांब थुक असे म्हणाले, तेव्हा परत त्याने जाणीव पुर्वक जारजवळ येऊन थुंकले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र यावेळी वाद वाढू नये म्हणून फिर्यादी घराकडे निघाले होते. यावेळी योगेश कोतवाल दिसल्याने त्यांना भेटुन दिपक गवारे शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. यावेळी त्याठिकाणी तीन चारचाकी गाड्या, अशा तीन गाड्या थांबल्या व त्या गाड्यामधुन 7 ते 8 जण खाली उतरले व त्यांनी काहीएक न विचारता लाथा बुक्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती भावाला दिली असता त्याने फिर्यादीला केसनंद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
