पुण्यात नेमकं चाललंय तरी काय.? MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार, टिळक रोडवर हल्ल्याचा थरार..


पुणे : पुण्यातील टिळक रस्त्यावर धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केले. आज बुधवारी (ता.६) पहाटे ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बालाजी यल्लाप्पा आरोटे (वय १९, रा. नांदेड. सध्या रा. हत्ती गणपती, सदाशिव पेठ) याने फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिसांनी तीन आरोपींना पानमळा परिसरातून अटक केली आहे. घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यातील आहे. तो काही महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेला आहे. सदाशिव पेठेतील अभ्यासिकेत तो जायचा. मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन तो रहातो. सदशिब पेठेत अनेक अभ्यासिका आहेत. रात्रीही या अभ्यासिका सुरू असतात. तिघे मित्र अभ्यास करून पहाटे दुचाकीवरून घरी निघाले होते.

टिळक रस्त्यावरील एका स्पोर्ट्सच्या दुकानासमोर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. एकाने त्याला पकडून बाजूला नेले. त्यानंतर गाडीतील कोयता काढून त्यांच्या डोक्यात वार केला. त्याने वार हुकवला. बालाजी आणि मित्रांनी पोलीस चौकीत धाव घेतली.

याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!