महिलेवर प्रियकरासह चौघांनी केला सामूहिक बलात्कार, घोडेगाव पोलिसांनी गुन्ह्यातील फरार ३ आरोपींना ठोकल्या बेड्या…
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2023/05/crime-4.jpeg)
घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाजवळ प्रियकरासह चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली. तसेच याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी प्रियकराला अटक केली.
तर या गुन्ह्यातील फरार झालेल्या ३ आरोपींना घोडेगाव पोलिसांनी भीमाशंकर परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे.
आदेश अशोक जाधव, संदेश अशोक जाधव (दोघे रा पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव) व संजय सुरेश शिंदे (रा जवळके, ता. खेड) यांना घोडेगाव पोलिस ठाण्यातील पथकाने भीमाशंकर परिसरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. आकाश चंद्रकांत भालेराव याला त्याच दिवशी पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
मिळालेल्या माहिती नुसार, पिडीत महिला आणि आकाश चंद्रकांत भालेराव या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. शुक्रवार (ता. २३) रोजी ते दोघे मोटारसायकल वरून चालेले होते. त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले.
आरोपींनी महिलेला घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाजवळील निर्जनस्थळी नेले. आणि पिडीतेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सामूहिकरीत्या बलात्कार केला. तसेच याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देखील दिली.