झारखंडमध्ये झाला चमत्कार! एका महिलेने 5 मुलांना दिला जन्म, आई आणि मुलंही ठणठणीत


झारखंड : झारखंडच्या रांची येथे सोमवारी (ता. २२) एका महिलेने चक्क 5 मुलांना जन्मदिला आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रांचीच्या रिम्सने स्वतः ही बातमी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर के आणि मुलांचा फोटो शेअर केला.

मंगळवार ठरला अपघात वार! सिंदखेडराजामध्ये भीषण बस अपघातात ९ ठार, १२ प्रवासी गंभीर जखमी

RIMS रांचीने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “चतर येथील एका महिलेने RIMS मधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात पाच मुलांना जन्म दिला आहे. बाळांना NICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉ शशी बाला सिंह त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रसूती झाली.” डॉक्टरांचे एक पथक बाळांवर लक्ष ठेवून आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

घनश्याम दराडेवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, तुम्हाला फक्त मीच

दरम्यान , झारखंडच्या रांची येथील RIMS येथे अशी दुर्मिळ प्रसुती झाली आहे. प्रसुतीनंतर आई आणि बाळांची प्रकृती उत्तम आहे. मात्र पाचही बाळे निरोगी असली तरी त्यांचे वजन कमी असल्याने त्यांना नवजात अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!