सोरतापवाडीत उद्यापासून दोन दिवसीय ‘पारंबी कलादालन’ महोत्सवाचे आयोजन; महिलांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी दर्जेदार व्यावसायिक बाजारपेठ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार..

उरुळी कांचन :महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याचा संकल्प बाळगून महिलांना व्यावसायिक संधी तसेच व्यावसायिक पाया उभारणीसाठी वाव देण्यासाठी ‘पारंबी कलादालन’ वर्षे २ या उपक्रमाचे यंदाही सोरतापवाडी (ता.हवेली) येथे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि. ३१ व रविवार दि.१ रोजी या भव्य सांस्कृतिक दालनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजिका शितल चौधरी यांनी दिली आहे.

या ‘पारंबी कलादालन’ उपक्रमाचे उद्घाटन शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या हस्ते शनिवार दि.३१ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून या उद्घाटन कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जेके फाऊंडेशनच्या वतीने यंदाच्या वर्षीही या २ ऱ्या पर्वात आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवात महिला बचत व वैयक्तिक महिलांच्या समूहाने उत्सहाने या उपक्रमात सहभाग घेऊन १०० दालनांची नोंद केली असून शोभेच्या वस्तूंची कलाकुसर, कापड, ज्वेलरी, खेळणी-वस्तू -सौंदर्य प्रसाधने, खाद्य पदार्थ व रांगोळी कलाकुसर अशी प्राक्तेशिके असा कला सांस्कृतिक ‘पारंबी कलादालन’ महोत्सव महिला वर्ग धाटणार आहे. दिवाळी फराळ पदार्थांची यंदाच्या वर्षी महिलांनी विक्रीचे दालन उभे केले आहे. भीमथडी व कृषी प्रदर्शन या धर्तीवरच महिलांना व्यावसायात प्रोत्साहन व व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यंदाच्या २ वर्षीय महोत्सवाचे दालन प्रेक्षक व ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आले आहे.

या महोत्सवात मुख्य उद्देश हा दुर्लक्षित महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळून देणे हा असून महिलांसाठी आत्मनिर्भर करण्यासाठीचा प्रेरणेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शितल चौधरी यांनी केले आहे.

