हडपसरला २ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणा-या चोरट्याला केले जेरबंद; ४ लाख १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त.


लोणी काळभोर : काळेपडळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने २ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणा-या चोरट्याला केले जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्याच्याकडून ४ लाख १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शंकर गणपत गायकवाड (रा, मोकळ्या मैदानामध्ये, तरवडेवस्ती, महंदवाडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून २ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहेत.मोबाईल चोरीच्या दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषक पोलिस हवालदार लाहीगुडे यांनी विश्लेषण करून सदर मोबाईलचे ठाव ठिकाण्याबाबत माहीत घेता, सदर मोबाईलचे लोकेशन हे तरवडेवस्ती, महंदवाडी, पुणे येथे असल्याचे तपासादरम्यान समजले. सदर ठिकाणी पोलिस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले यांनी सदर परिसरात आरोपी इसमांच्या बाबत माहीती घेत असताना व त्यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे तरवडेवस्ती येथे चोरीच्या दोन मोबईलसह शंकर गणपत गायकवाड हा मिळुन आला. त्याला घेऊन तो रहात असलेल्या ठिकाणी पोलिस पथक गेले,त्यावेळी मोकळ्या मैदानामधील मोकळ्या मैदानामध्ये असलेल्या झोपडी समोर दोन दुचाकी गाड्या दिसून आल्या असता, त्यापैंकी एका मोपेड दुचाकी गाडीच्या पुढील बाजुस मोकळ्या जागेमधील हुकला एक पांढऱ्या रंगाचे पिशवी अडकवलेली दिसून आली असता, सदर पिशवी उघडुन पाहीली त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे १५ हॅन्डसेट मोबाईल फोन मिळुन आले.

मोबाईल व दुचाकी गाड्यांबाबत त्याचेकडे चौकशी करता, त्याने मोबईल फोन हे त्याचे इतर दोन साथीदारांसह मिळुन काळेपडळ, भारती विद्यापिठ परिसरातुन चोरी केले आहेत व दुचाकी गाड्या हया त्याचे दोन साथीदारांसह मिळुन रस्तापेठ व हांडेवाडी परिसरामधून चोरी केल्याचे सांगितले.

सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, काळे पडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!