देवाला बोकडाचा बळी द्यायला निघालेल्या गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, बोकड सुखरूप, कसा घडला दैवी चमत्कार?


जबलपूर : मध्य प्रदेशात झालेले आहे एका अपघाताची सगळीकडे चर्चा सुरु आहे देवाला बोकडाचा बळी देण्यासाठी चार भक्त गाडीतून निघाले होते.दुर्दैवाने गाडीचा अपघात झाला आणि चारही जणांचा मृत्यू झाला. मात्र या घटनेत बोकड वाचले आहे.

जबलपूरच्या जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घडला आहे. या घटनेत किशन पटेल, राजेंद्र पटेल, सागर पटेल, महेंद्र पाटील या चौघांचा मृत्यू झाला, तर जितेंद्र पटेल आणि मनोज प्रताप हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, श्री शेत्र नरसिंहपुर येथील दादा दरबारात बोकड अर्पण करण्यासाठी पटेल कुटुंब निघाले होते. बोकड आणि कोंबडा अर्पण करून ते जबलपूरला माघारी येत होते जबलपूरला परतल्यानंतर बोकडाचे मटण आणि कोंबडी शिजवून त्याचा देवदेवाचा कार्यक्रम ते करणार होते. मात्र चारगव्हाण जबलपूर रस्त्यावर दुपारच्या वेळी अचानक वाहनाचा वेग वाढल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी नदीच्या पत्रात कोसळली.

हा वेग एवढा होता की नदीपात्रावरील रेलिंग तोडून गाडी खाली कोसळली. गाडी नदीपात्रातील दगडावर आपटल्याने गाडीचा चेंदामेंदा झाला होता. आणि आतीलही चार जण जागीच मृत्युमुखी पावले होते. या घटनेत इतर दोघेजण जखमी झाले मात्र बळीचा बकरा सुरक्षित राहिला त्याचा फक्त एक कान कापला गेला. कोंबडीचा मात्र मृत्यू झाला. या घटनेची सगळीकडे सध्या चर्चा सुरु झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!