मोठी बातमी! पुणे पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीची फसवणूक….

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाचे खोटे आमिष दाखवून आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार एका तरुणीने केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यांवरून पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य रायसिंग जाधव (वय ३२) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सन २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जाधव आणि पीडित तरुणी यांची ओळख झाली होती.

याचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झाले. याचा फायदा घेत उपनिरीक्षक जाधव यांनी तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन दिले आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर तरुणीने विवाहाबद्दल विचारणा केली असता जाधवने लग्नास स्पष्ट नकार दिला. तसेच तरुणीला शिवीगाळ व मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याची धमकीही देखील दिली.
आपला विश्वासघात करून आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षांत आलेने तिने होत असलेल्या त्रासाला कंटाळून फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यांवरून पोलिसांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
