पुण्यात खळबळ! १८ वर्षीय तरूणीला भररस्त्यात संपवलं, नेमकं काय घडलं?


पुणे : १८ वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. शहरातील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात ही घटना घडली. दोन तरुणांनी पाठलाग करुन तरुणीची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली.

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून या तरुणीला संपवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना रविवारी, ११ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कोमल भरत जाधव (वय १८) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.घटनेच्या वेळी कोमल रस्त्यावरून जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी तिच्यावर अचानक हल्ला चढवला.

त्यांनी आपल्याजवळील धारदार शस्त्रांनी कोमलवर अनेक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, कोमल रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हत्या ]केल्यानंतर दोन्ही मारेकरी तरुण दुचाकीवरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे हल्लेखोर कैद झाले आहेत. त्यांनी डोक्याला हेल्मेट घातले होते आणि अंगात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!