महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना झटका! दूध दरात होणार ‘एवढ्या’ रुपयांनी वाढ, जाणून घ्या, दरवाढ का आणि कधीपासून..

पुणे : महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. कारण, राज्यात दूध खरेदी महागणार आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे.
नवी दरवाढ उद्यापासून, शनिवारपासून लागू होणार आहे. पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.
दरम्यान, दूध दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता गाय आणि म्हैस दूध दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ शनिवार (ता.१५) पासून लागू होणार आह.
सध्या गाईचे दूध हे प्रति लिटर ५६ रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर ७२ रुपये या दराने विक्री होत आहे. पण आता दुधाय्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे गाईच्या दुधासाठी ५६ रुपयांवरुन ५८ रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत. तर म्हशीच्या दुधासाठी ७२ रुपयांच्या ऐवजी ७४ रुपये मोजावे लागणार आहेत.