चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न, लग्नानंतर काश्मिरला फिरायला गेलेल्या जोडप्यावर दहशवाद्यांचा हल्ला, दहशतवाद्यांना म्हणाली…


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना पल्लवी म्हणाली की, ‘मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका…यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा…ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असे दहशतवादीने सांगितले.’

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले आहे.

पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात, लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं. या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झाले आहे.

या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे. पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना पल्लवी म्हणाली की, ‘मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका…यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा…ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असे दहशतवादीने सांगितले.’

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!