भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरलं ; दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी….

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात भयंकर स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा स्फ़ोट इतका भीषण होता की, या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या स्फोटामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टिकैतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराय बरई गावामध्ये ही घटना घडली. या गावामध्ये असणाऱ्या फटाक्याच्या कारखान्यात दुपारच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर सर्वजण घाबरून पळू लागले. या स्फोटामध्ये कारखान्यामध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्या. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या स्फोटामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान स्फ़ोटची ही घटना फटाके आणि गनपावडरच्या बेकायदेशीर साठवणुकीमध्ये झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक टीम देखील आली आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. मदत आणि बचावकार्य देखील युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांकडून गावकऱ्यांची चौकशी केली जात आहे.
