थेऊर ग्रामपंचायत हद्दीत मजुराला बांबूने बेदम मारहाण ; ‘तू इथे काम करायचं नाही ‘अशी दमदाटी केली अन…


लोणी काळभोर : थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात शनिवारी (ता. 13) दुपारी एका मजुराला दोघांनी बांबूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो मजूर प्लॉटिंगमध्ये काम करत असताना “तू येथे काम करायचे नाही” असे म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली..या मारहाणीत मजूर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर शंकर इंगळे (वय 40, रा. काळे वस्ती थेऊर ता. हवेली जि. पुणे) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. तर समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर (रा. थेऊर ता. हवेली, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सागर इंगळे व समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर हे एकाच गावात राहतात. दरम्यान, सागर प्लॉटिंगमध्ये काम करत असताना त्या दोघांनी तेथे येऊन त्याला शिवीगाळ करत मारहाण केली.मारहाणीतून वाचण्यासाठी इंगळे हे सदर ठिकाणावरुन पळून चालले होते. तेव्हा मनीषा पाचोरकर यांनी फिर्यादीला पाठीमागून जोरात पकडले. त्यानंतर समीरने तेथेच बाजूलाच पडलेल्या बांबुने फिर्यादीच्या डाव्या हातावर व डाव्या पायावर जोरजोराने मारहाण केली. या मारहाणीत इंगळे यांच्या डाव्या हाताला व डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले होते.याप्रकरणी सागर इंगळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या मारहाणप्रकरणी आता समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 118(2), 352 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत.

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!