दिल्लीत घडले भयंकर! थंडी टाळण्यासाठी लावलेल्या हिटरने घेतले सहा जणांचे बळी, काय घडले नक्की..!!

नवी दिल्ली : दिल्लीत थंडीचा पारा कमालीचाकोसळला आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दिल्लीकर विविध उपाय करीत आहे. अशातच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या हिटरमधून शॉर्टसर्किट होऊन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पीतमपुरा भागात हि दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. अख्खं कुटूंब उद्धवस्त झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यापाऱ्याच्या घरातील वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ही आग काही क्षणांत पसरली आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आहे. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग हिटरमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घरात लाकडाचं सामान जास्त असल्याने आग वेगानं पसरली आणि त्यामुळे ही भयंकर दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दलाने पाच लोकांना रेस्क्यू केले आहे.
दरम्यान, मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.