सुहागन येथे महाकाय ११ फूट लांबीचा अजगर पकडला, पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी…


पूर्णा : सुहागन येथे ११ फूट लांबीचा अजगर मादी जातीचा अजगर पकडण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्याने सुटकेचा श्वास सोडला आहे. अजगर पाहण्यासाठी नागरीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

नेमकं घडलं काय?

सुहान येथील सोसायटीचे चेअरमन बालाजी नामदेव भोसले यांच्या शेतात गट नंबर २६५ मध्ये अजगर ब-याच दिवसापासून वास्तव्यास होते. भोसले यांना शेतात विहिरीजवळ बऱ्याच वेळेस आढळल्यामुळे त्यांना भीती वाटत होती. रविवार (ता.१९) मे रोजी सर्प अभ्यासक असलेले डॉ. विक्रम सारंग, सर्पमित्र नवनाथ सारंग यांना बोलावून घेतले.

त्यांच्या विहिरीजवळ ११ फूट लांबीचे साडेआठ किलोचे अजगर आढळून आले. अजगर पकडल्यानंतर पाच अंडी सुद्धा सापडले व त्यानंतर गावाकडे आणून गावातील नागरिकांना दाखविण्यात आले. नागरिकांनी अजगराला पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. भोसले यांनी सुटकेचा श्वास सोडल्यानंतर वन विभाग नांदेडला नोंद करून अजगराला सोडून देण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!