नाशिकमध्ये प्रसिद्ध डॉक्टरन उचललं टोकाच पाऊल; थेट नायलॉनच्या दोरीनेच …,वैद्यकीय क्षेत्रात खळबळ..


नाशिक : शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा जेजुरकर या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील नामांकित मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी होत्या.नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास होत्या. शुक्रवारी त्यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच गंगापूर रोड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.डॉ. मनीषा यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान स्वतः पेशाने डॉक्टर असलेल्या मनीषा यांच्या आत्महत्येमागे कौटुंबीक कारण आहे की त्या स्वतः काही मानसिक दडपणाखाली होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!