हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलचा डॉक्टर निघाले ‘आयएसआयशी’संबंधित! राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक…!

पुणे : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करण्यात आली. एका डॉक्टरास अटक केली आहे.
यापूर्वी पुणे शहरात १८ जुलै रोजी दोन जणांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांचा संबंध जयपूर बॉम्ब ब्लॉस्ट प्रकरणाशी होता. एनआयएच्या मोस्ट वॉटेंडच्या यादीत ते होते.
महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी या दोघांची नावे आहे. त्यांचा एटीएस तपास करत आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका डॉक्टरास अटक केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय तपास संस्था महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास करत आहे. या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक केली आहे. आता गुरुवारी पुणे शहरातून राज्यातील पाचवी अटक झाली आहे. पुण्यातून डॉ.अदनान अली सरकारला अटक केली आहे.
कोंढवा परिसरात राहणारा हा डॉक्टर भूलतज्ज्ञ आहे. ४३ वर्षीय या डॉक्टरास १६ वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या घराची तपासणी केल्यावर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. ते सील करण्यात आले.
बीजेमधून केले MBBS
डॉक्टर अदनान अली सरकार याने २००१ मध्ये पुण्यातील बीजे शासकीय महाविद्यालयातून MBBS केले. त्यानंतर २००६ मध्ये MD एनेस्थीसिया (भूलतज्ज्ञ) केले. ISIS समर्थक असलेला डॉ अदनान याला इंग्रजी, हिंदी, मराठी, आणि जर्मन भाषेचे ज्ञान आहे. अनेक पुस्तकांमध्ये त्याने लिखाण केले आहे.