राज्यात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा कट, पण…! देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप…

मुंबई : अकोला आणि शेवगाव या दोन्ही ठिकाणी पूर्णत: शांतता आहे. सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असून कट रचल्या जात आहे. मात्र, कोणालाही दंगली घडवू देणार नाही.

दंगेखोरांना अद्दल घडवू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नसल्याचे ते म्हणाले.

दंगली घडवण्याचे प्रयत्न शंभर टक्के जाणूनबुजून होत आहेत. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.
Views:
[jp_post_view]
