पुण्यात धाडसी दरोडा ; उद्योजकाच्या बंगल्यात घुसून तब्बल सहा लाखाचा ऐवज लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या..


पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्यात खून, दरोडा,मारामारी, कोयता यांच्या दहशतीचे प्रकार समोर येत असतानाच आता निगडी-प्राधिकरणात वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून वृद्धाचे हातपाय बांधून, पिस्तुलाचा धाक दाखवून सहा लाखांचा ऐवज लुटल्याचा प्रकार समोर आला होता. या चोरीचा मुख्य आरोपी राजस्थानपर्यंत तब्बल 1200 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केल आहे.तर, एका आरोपीला तळेगाव येथून ताब्यात घेण्यात आले.लुटून नेणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे.

निगडी प्राधिकरणात 19 जुलै रोजी सायंकाळी चंद्रभान अगरवाल, वय 76, या वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून पाच दरोडेखोरांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हातपाय बांधले आणि घरातील कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे असा तब्बल सहा लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.गुन्हा केल्यानंतर मोबाइल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाइलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान दरोडेखोरांनी बंगल्यालगतच्या खोलीत राहणाऱ्या रखवालदारासह त्याची पत्नी व दोन मुलांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले. त्यानंतर ते पसार झाले. या दरोड्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी सुरेश लादुराम ढाका, महिपाल रामलाल विष्णूई या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल,सोन्याचे दागिने फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड,गाडीची आरसी बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!