भीषण अपघाताने राज्य हादरलं!! कंटेनरने सहा जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर…

बीड : बीडमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली.

तसेच दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, याठिकाणी वेगात असलेल्या कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले. हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलीस देखील याठिकाणी दाखल झाले.
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलीस याबाबत तपास करत आहेत. याबाबत अजून मृत व जखमींची नावे समोर आली नाहीत. अपघात नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ झाला.

याबाबत कंटेनरचा चालक ताब्यात घेण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याठिकाणी काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच पद्धतीने एका कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता देखील याठिकाणी हा भीषण अपघात झाला.
त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगावर आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत ते तपास करत आहेत.