कट्टर विरोधकांमध्ये जुंपली ; ‘कोण ओळखत त्या खडसेला?’ ; गिरीश महाजनांचा जिव्हारी लागणार वार…..


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. कट्टर विरोधक म्हणून ओळख असणारे भाजप नेते गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत.आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार वार केला आहे. ‘कोण ओळखतो त्या खडसेला?’ असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कळत नाहीत. खडसेंबाबत आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र पक्ष चंद्रकांत पाटील हे वेगळं लढतायत. एकनाथ खडसे लोकसभेला म्हणतात सुनेला मदत केली. प्रत्येक निवडणुकीला खडसे हे आपली भूमिका बदलत असतात. एकमेकाला शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचं” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. या टिकेला आता खडसे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोघे एकाच पक्षात होते.मात्र आता ते दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही कट्टर विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून महाजन यांनी खडसे यांच्यावर जिव्हारी लागणारा वार केला आहे.याआधी मुक्ताईनगरमध्ये ताकद कमी झाल्याचं एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं होतं. बरोबर आहे खडसेंचं. काय चुकीचं त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते खडसे आहेत आणि ते असं म्हणतात तर त्यांचं बरोबर आहे असं गिरीश महाजन म्हणाले.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!