जमिनीचे परस्पर खरेदीखत केल्याचा रागातून पाटस ग्रामपंचायत सदस्याला लोखंडी गजाने मारहाण , यवत पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल ..!!
यवत : शेतजमिनीच्या वादातुन दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र विठ्ठल शिंदे यांना लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील नेताजी देशमुख व देवीदास सुदाम सोनवणे (दोघे रा. पाटस ता. दौंड जि. पुणे ) असे या गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे असून गुरुवारी (दि २५) ही घटना घडली आहे . दिड वर्षांपूर्वी पाटस येथील भानोबा नगर येथील जमिन गट नं. 926/927 मधील 5 एकर क्षेत्र गोदाबाई हळंदे यांच्याकडून राजेंद्र शिंदे यांनी खरेदी केली होती या विवादातून मारहाण घडली आहे.
गुरुवारी (दि २५) आरोपींनी शिंदे यांना तुमच्या सोबत बोलायचे आहे, तुम्ही आमचे घरी चला असे म्हणून घरी बोलावून घेतले. शिंदे त्यांच्या घरी गेले असता, तु आमचे परस्पर हळंदे यांचे क्षेत्र कसे काय विकत घेतले? ते आम्हाला खरेदी करायचे होते असे म्हणून शिवीगाळ करीत लोखंडी गजाने जबर मारहाण केली.
या मारहाणीत शिंदे यांच्या मांडीला, हाताला, पाठीला गंभीर मार लागल्याने जखमी झाले. तसेच शिंदे यांच्या बोटामधील सोन्याची अंगठी गहाळ झाली. याबाबत शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने या दोघांवर शिवीगाळ करणे व गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .