राज्यात खळबळ! ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, कला केंद्राच्या नावाखाली करत होता वेश्याव्यवसाय…


बीड : बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रत्नाकर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, बीडच्या केज तालुक्यातील उमरी गावात कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. तक्रार दाखल होताच आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह सपोनि सुरेखा धस यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला.

उमरी येथील महालक्ष्मी कलाकेंद्रावर हा सर्व प्रकार सुरू असल्याचे पोलीस कारवाईत समोर आले. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे तिथं होते मात्र लगेच पळून गेले, अशी माहिती देखील समोर आली.

दरम्यान, एकीकडे राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू असताना दुसरीकडे बीडमधून ही खळबळजनक घटना समोर आली. कला केंद्राच्या अड्ड्यावर जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा दोन्ही गाड्या मिळून आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!