पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपी दत्ता गाडेचा खोटेपणा उघड, पोलिस तपासात समोर आली धक्कादायक माहिती..

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये झालेल्या तरुणीवरील अत्याचाराने सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे. जवळपास ७० तासानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले होते.
आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला निर्दोष सांगत अनेक दावे केले होते, मात्र त्याचे सर्व दावे खोटे ठरले आहेत. त्याची खोटी बाजू समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते.
मी तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले, असा दावा त्याने केला होता. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता.
पिडीत तरुणीवर बलात्कार झालाच नाही असा दावा आरोपी दत्ता गाडे याने केला होता. मात्र दत्ताने ज्या तरूणीला साडेसात हजार रपये असा दावा केला, त्याच दत्ता गाडेच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्या खात्यात फक्त २४९ रुपये शिल्लक असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे त्याने तरूणीला पैसे दिल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे.
एवढंच नव्हे तर त्याची आणखी एक खोटी बाजू समोर आली आहे. आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असा दावा दत्ता गाडेने वकिलांमार्फत केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती.
त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. मात्र त्यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे दत्ता गाडेचा आणखी एक खोटारडेपणा उघड झाला.