पुण्यात 26 वर्षीय विवाहितेची मांत्रिकाकडून फसवणूक; तब्बल 3 लाख उकळले, काय आहे प्रकरण?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात मांत्रिकाकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच आता मूल होत नसल्याच्या समस्येवर उपाय म्हणून मंत्रोच्चार आणि अंगारा लावून महिलेला पेढा देऊन एका मांत्रिकाने महिलेकडून तीन लाख १५ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गिरीश बलभीम सुरवसे, वय ३६ वर्ष, रा. भोसरी, याच्यावर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत पीडित 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली. या तक्रारीनुसार आरोपी सुरवसे याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. हा प्रकार २८ जुलै ते नऊ सप्टेंबर २०२५ या काळात घडला आहे. आरोपीने पीडीतेला विश्वासात घेऊन मंदिरात नेले.विधी पार पडल्याच सांगत अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख १५ हजारांचा ऐवज घेतला.

दरम्यान पीडित महिलेलाआपली फसवणूक झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर पीडितेने तक्रार दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!