मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा कहर, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर…!

चेन्नई : तामिळनाडूमध्ये नागापट्टिनम जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागापट्टिनम, तिरुवरूर आणि मायिलादुथुराई जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या पावसामुळे मोठे नुकसान देखील झाले आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाबावामुळे याठिकाणी पाऊस पडत आहे. याबाबत माहिती येथील जिल्हाधिकार्यांनी दिली आहे.
फेब्रुवारीमध्ये काही दिवसात वायव्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.
यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या तमिलनाडूच्या किनारी प्रदेशांत पाऊस सुरू आहे. येत्या ४८ तासांत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
याठिकाणी थंडी कमी झाली आहे. पावसाचा पुढील अंदाज घेऊन शाळा आणि कॉलेजबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.