क्रांतिकारी गीतकार गदर यांचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


चेन्नई : क्रांतिकारी गीतकार गदर यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. उस्मानिया विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काळापासून ते क्रांतिकारी गायक आणि नक्षलवादाचे सहानुभूतीदार होते.

त्यांनी १९६९ मध्ये तेलंगणा चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि चळवळीच्या समर्थनार्थ अनेक गाण्यांना आवाज दिला. यामुळे ते नेहेमी चर्चेत असायचे. १० दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.

त्यांना दाखल करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी विमला व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा दुसरा मुलगा चंद्रुडू २००३ मध्ये मरण पावला.

१९४९ मध्ये मेडक जिल्ह्यातील तुपारन येथे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या गदर यांचे मूळ नाव गुम्मडी विठ्ठल राव होते, परंतु ते त्यांच्या गदर नावाने लोकप्रिय झाले. पुढे याच नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!