निष्ठावंताला मिळालं फळ! भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी गणेश कुटे यांची निवड

वाघोली : लोणीकर यांनी निष्ठावंत कार्यकर्ते गणेश कुटे यांची भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘युवा’ मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

तसेच सर्वसामान्य शेतकरीच कष्टकरी कुटुंबातील स्वकर्तुत्वाने समाजात आदराचे स्थान मिळविलेल्या गणेश कुटे यांची निवड केल्याने सर्व सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गणेश कुटे यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल, भाजप नेते विक्रांत पाटील, राहुल लोणीकर, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, भाजप नेते रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, संदीप सातव, ग्रामपंचायत अविनाश कुटे, प्रदीप सातव पाटील, जयप्रकाश सातव पाटील, गणेश सातव, विजय जाचक आदींनी अभिनंदन केले आहे.
