बारामती- दौंड विभागात जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अखेर बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..


पुणे : बारामती- दौंड विभागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

अजय सुदाम पवार (वय २२ वर्षे रा. माळेगाव आदर्श नगर ता. बारामती, जि. पुणे), योगेश बालाजी कांबळे (वय. १९ वर्षे, रा. नुर कॉलनी, शिवनी रोड, गांधीनगर बीड), भुतेली लालधर गुप्ता (वय. ३२ वर्षे रा. पानसरे वस्ती दौंड ता दौंड जि पुणे मुळ रा. लंगल लाला छपरा चंपापुर जि कुशीनगर उत्तरप्रदेश), राहूल पांडुरंग शिंदे (वय. ३५ वर्षे रा. माळुंगे गट नंबर दोन अकलुज ता माळशिरस जि सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बारामती- दौंड विभागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आण्याचे काम गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून दोन पथके नेमली.

बारामती दौंड विभागातील जबरी चोरीचे गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु करून गापेनीय बातमीदाराकडून मिळाले. त्यानुसार त्यांनी चारही आरोपींचा शोध लावून त्यांची चोकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून गुन्हयातील मोबाईल हस्तगत करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे बारामती उपविभाग व स्वप्निल जाधव, दौंड उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!