दौंड तालुक्यातील ‛बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या गोपाळवाडी शाखेत ग्राहकांची एक कोटींची फसवणूक, शिपाईच ठरला मास्टरमाईंड, पोलिसांनी केली अटक..


दौंड : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथे असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बँकेत काम करणाऱ्या कंत्राटी शिपाईने या बँकेतील ग्राहकांची तब्बल १ कोटी ७३ लाख ३७ हजार ९८३ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

बँकेतील कंत्राटी शिपाई परशुराम तुकाराम भागवत (रा. बेटवाडी दौंड) याला बुधवारी रात्री उशिरा दौंड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पुण्याचे बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर अमित चंदन मदन चौधरी यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळवाडी च्या बँक महाराष्ट्र मध्ये कंत्राटी पद्धतीवर हाऊस किपिंग चे काम करणारा परशुराम तुकाराम भागवत याने २०१८ पासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोपाळवाडी येथे काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणकावर बसून त्यांचे युजर आयडी व पासवर्ड वापरून बँकेतील खातेधारक यांची आर्थिक फसवणूकीचे व्यवहार केले आहेत.

परशुराम भागवत हा ग्राहकांच्या फिक्स डीपॉजीट बुकमधून को-या कागदावर खातेधारकांना फिक्स डीपॉजीट रक्कम खात्यात जमा झाली आहे असे भासवून त्यांना हाताने लिहलेल्या बनावट पावत्या देत होता.

तसेच खातेधारकांना बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची महा डबल स्किम आली असून त्यात पैसे गुंतवून डबल होतील असे खोटे सांगून लोकांना त्यात पैसे गुंतवण्यास लावत असे आणि या लोकांकडून कोरे चेक घेवून खोट्या इलेक्ट्रीक साहित्याचा वापर करून बँकेच्या नावाचा बनावट दस्ताऐवज व पावत्या तयार करून त्यांना त्या देत होता.

हे सर्व झाल्यांनातर तो खातेधारकांची फिक्स डिपॉजीट रक्कम ही बँकेच्या व संबधीत खातेदाराच्या संमती शिवाय परस्पर तोडून (ब्रेक) करून स्वताच्या व कुंटूबातील व्यक्तींच्या नावावर जमा करून तसेच काही कर्ज खाते धारक यांचे कर्ज खात्यात पैसे जमा करण्याच्या बहान्याने ते पैसे स्वताकडे घेवून त्यांना ते पैसे त्यांचे खात्यात जमा केल्याचे बनावट उतारे/पावत्या व त्यावर बँकेचे शिक्के मारून बनावट सहया करून, बँकेच्या लौकीकास बाधा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता.

दरम्यान, परशुराम भागवत याने या सर्व कृतीतून आत्तापर्यंत बँक खातेदारांची सुमारे १ कोटी ७३ लाख ३७ हजार ९८३ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादी यांना वरील प्रकाराची खात्री झाल्यानंतर त्यांनी घडल्या प्रकाराची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून परशुराम तुकाराम भागवत याला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!